मनुस्मृतीच्या दावणीला डार्विन-मेंडेल!
[आनुवंशिक गुणसंच आणि परिस्थितीमुळे येणाऱ्या मर्यादा यांच्या परस्परपरिणामांमधून सजीव सृष्टी घडत जाते, ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीमागची मर्मदृष्टी (insight). तिला बळ पुरवले मेंडेलला सापडलेल्या आनुवंशिकतेच्या यंत्रणेने. या यंत्रणेचा गाभा म्हणजे आनुवंशिक गुण रेणूंच्या, जीनसंचांच्या रूपात व्यक्तींकडून त्यांच्या संततीकडे जातात. नैसर्गिक निवड अखेर असे गुणसंच निवडते. यात त्या गुणसंचांची व्यक्तींमधून होणारी अभिव्यक्ती (expression) महत्त्वाची असते. आणि निवड …